रत्नागिरी : कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना ‘रत्नागिरी भूषण’ 2025 पुरस्कार

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि सांस्कृतिक जतनाला चालना देणाऱ्या कुणबी महोत्सवात कोकणातील ग्रामीण भागातील प्रश्नांना नेहमीच परखडपणे न्याय देणारे, धडाडीचे आणि निःपक्षपाती पत्रकार म्हणून ओळखले जाणारे कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना “रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025” ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कोकणातील प्रथमच गोताडवाडी येथे आयोजित भव्य कुणबी महोत्सवाच्या निमित्ताने हा सन्मान प्रदान करण्यात आला.

banner 728x90

सुहास खंडागळे आणि उदय गोताड यांच्या आयोजनाखाली झालेल्या या सांस्कृतिक उत्सवात रविवारी मान्यवरांच्या हस्ते तेजस बोरघरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला, क्रीडा, पत्रकारिता, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Screenshot

कोकणाच्या मातीशी नाळ जुळवून, तळागाळातील जनतेची वेदना, प्रश्न, संघर्ष आणि विकासाची गरज सातत्याने जनतेपुढे आणणारे कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी काम केलं आहे.


त्यांच्या कार्याची व्यापकता, धडाडी आणि निःपक्षपाती भूमिका लक्षात घेऊन त्यांना “रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025” देण्यात आला.

गेल्या आठ वर्षांमध्ये तेजस बोरघरे यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख माध्यमसंस्थांमध्ये कार्य करताना स्वतःचे वेगळेपण जपले आहे. त्यांनी लोकसत्ता, मॅक्स महाराष्ट्र, लोकशाही, जय महाराष्ट्र या प्रतिष्ठित न्यूज नेटवर्कमध्ये काम केल्यानंतर सध्या ते पुढारी न्यूजमध्येही कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते कोकण कट्टा न्यूजचे संपादक म्हणून काम पाहत असून या माध्यमातून त्यांनी कोकणातील तळागाळातील समस्या प्रभावीपणे समाजासमोर मांडल्या आहेत.

या प्रसंगी कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युट्यूबर तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात कोकणातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध उपक्रमही राबविण्यात आले.

या कार्यक्रमाला कोकण कट्टा न्यूजचे संपादक आणि पुढारी न्यूज चॅनेलचे वृत्तनिवेदक तेजस बोरघरे रील्स्टार संदीप पावसकर, चला हवा येऊ द्या फेम अभिनेते सचिन काळे, सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर, प्रा. डॉ. आनंद आंबेकर तसेच गावकर राजेश गोताड,माजी पोलिस पाटील रामचंद्र धावडे, कृषितज्ज्ञ राहुल यादव, बुधाजी खंडागळे,आयोजक सुहास खंडागळे, उदय गोताड,मंगेश धावडे, श्यामकर्ण भोपळकर, सुरेंद्र काब्दुले, डॉ.मंगेश कांगणे,अमित गमरे,नितीन गोताड, सतेज जाधव, अनघा कांगणे, ईश्वरी यादव, स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *