रत्नागिरी : दुचाकी आणि रिक्षा टेम्पो यांच्यातअपघात एकाचा मृत्यू , 2 जखमी

banner 468x60

खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळ शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या ॲक्सेस दुचाकीने रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला.

banner 728x90

यामध्ये दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही कपडगाव येथील रहिवासी असून ते रत्नागिरीहून कापडगावकडे ॲक्सेस दुचाकीवरून चालले होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवळी येथून रत्नागिरीच्या दिशेने येणारा रिक्षा-टेम्पो (एमएच ०८ बीसी १२७९) रात्री सुमारे ९.२० वाजता खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळ आला असता समोरून येणाऱ्या ॲक्सेस दुचाकीने (एमएच ०८ एडब्ल्यू १६६२) त्याला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकी चालवणारा राज सुधाकर कोत्रे (वय १९, रा. कापडगाव) याचा मृत्यू झाला. तर आर्यन विनोद कुरतडकर (१९) आणि पार्थ विजय कुरतडकर (१९, तिघेही राहणार कापडगाव, रत्नागिरी) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *