श्रृंगारतळी : सतर्क नागरिक आणि ‘महावितरण’ कर्मचाऱ्यामुळे दुर्घटना टळली

banner 468x60

शृंगारतळी येथे काल,बुधवारी १० डिसेंबर २०२५रात्री साडेदहाच्या सुमारास एका आंब्याच्या झाडावर आग लागल्याची घटना घडली.

banner 728x90

मात्र,नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली आहे

ही आग झाडावरून गेलेल्या थेट केबलपर्यंत पोहोचल्याने, नजीकच्या घर आणि दुकान गाळ्यांना धोका निर्माण झाला होता.
​रात्री १०.३० वाजता काही नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच,त्यांनी त्वरित वकील सुशील अवेरे यांच्याशी संपर्क साधला.


सुशील अवेरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन,गावच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘झाडाला आग लागली आहे,बॅटरीची गरज आहे, असा संदेश पाठवला.


​काही मिनिटांतच गावातील नागरिक,महावितरणचे कर्मचारी चव्हाण आणि ग्रामपंचायत पाठपन्हाळेचे उपसरपंच असीम साल्हे बॅटरी घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
पाहणी केली असता, आग आंब्याच्या झाडाखालून गेलेल्या केबलला लागली होती आणि ती झाडाच्या वरच्या टोकापर्यंत जळत जात असल्याचे निदर्शनास आले.


​महावितरणचे कर्मचारी चव्हाण यांनी विलंब न लावता,तातडीने परिसराचा विद्युत पुरवठा खंडित केला.
त्यानंतर त्यांनी जळणारी केबल त्वरित कट केली. व पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत केला जर ही केबल अशीच जळत राहिली असती, तर बाजूला असलेल्या घर आणि दुकान गाळ्यांना धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
​वकील सुशील अवेरे,स्थानिक नागरिक,पत्रकार आणि वायरमन चव्हाण यांच्या वेळीच दाखवलेल्या सावधगिरीमुळे आणि धाडसामुळे परिसरातील मोठा अनर्थ टळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *