दापोली-भडवळे वस्तीवर जाणाऱ्या एसटी बसच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे ५० लिटर डिझेल चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दापोली पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली बसस्थानकातून ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सुटलेली दापोली-भडवळे ही बस (एम.एच. २० बी.एल. १२५२) चालक गणेश दिगंबर आकरे यांच्याकडे होती. सायंकाळी ही बस भडवळे शेरे भोईवाडी येथे पोहोचली. त्यानंतर रात्री सुमारे ८ वाजता चालक आकरे हे बस लावून वस्तीतील अंगणवाडी येथे झोपण्यासाठी गेले.
बुधवारी सकाळी सुमारे ६.१० वाजता चालक आकरे बसजवळ आले असता, बाह्य तपासणीदरम्यान बसच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडलेले आढळून आले. तसेच टाकीतील सुमारे ५० लिटर डिझेल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीस गेलेल्या डिझेलची किंमत अंदाजे ४ हजार ४७३ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेची माहिती चालक आकरे यांनी एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार दापोली पोलीस ठाण्यात डिझेल चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













