दापोली : गुडनाईट लिक्वीड प्यालेल्या दोन बालिकांना जीवदान

banner 468x60

दापोली तालुक्यातील मुरुड येथील लोटस रिसॉर्ट या ठिकाणी पुणे बावधन परिसरातील त्रिपाठी नामक कुटुंब पर्यटनासाठी आले होते. या पर्यटकांच्या दोन जुळ्या चिमुकल्यांनी हॉटेलच्या रूममध्ये लावलेले मधील डासांना घालवण्यासाठी लावण्यात आलेले चक्क गुडनाईट लिक्वीड ओढून काढून त्यातील लिक्विड प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली.

banner 728x90

काही वेळातच हा सगळा धक्कादायक प्रकार त्यांच्या आई-वडील यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ याची माहिती लोटस रिसॉर्ट हॉटेल व्यवस्थापनाला दिली. हॉटेल व्यवस्थापनानेही क्षणाचाही विलंब न लावता थेट गाडी काढून या मुलांना व पर्यटकांना घेऊन थेट दापोली येथील बाल रुग्णालय गाठले. मात्र दोन्ही ठिकाणी खाजगी बाल रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नव्हते. सायं. ७च्या

सुमारास मुरुडच्या दिशेने निघालेली गाडी दापोलीकडे वेगाने आली, ही कार इतक्या वेगाने का आली, हे पाहण्यासाठी दापोलीतील बुरोडीनाका परिसरात उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते भाई झगडे, सुयोग घाग व स्वप्निल जोशी यांनी माहिती घेतली व तत्काळ त्यांनी मदत करण्यासाठी क्षणाचाही विलंब न लावता पुढाकार घेतला. व थेट शासकीय दापोली उपजिल्हा रुग्णालय गाठले. हा सर्वप्रकार दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पवन सावंत यांना सांगण्यात आला.

त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता, या दोन्ही बालकांवर तत्काळ उपचार सुरू करून प्रसंगावधान दाखवत दोघांचीही प्रकृती स्थिर केली. पुढील उपचाराकरता या दोन्ही मुलांना पुण्यात हलविण्यात आले. पालकांनी हॉटेल व्यवस्थापनाने केलेली धावपळ दापोलीतील सामाजिक कार्यकत्यांनी मदतीसाठी घेतलेला पुढाकार उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पठन सावंत यांनी दाखवलेली समयसूचकता, त्यामुळे या दोन्ही बालकांचे प्राण सुखरूप बचावले आहेत. या सगळ्या घटनेची नोंद दापोली उपजिल्हा रुग्णालय व दापोली पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *