चिपळूण : दारू पिण्यासाठी घर सोडले आणि परतलाच नाही; पुलाखाली आढळला मृतदेह

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील नांदगाव गावकरवाडी येथे दारू पिण्याची सवय असलेल्या ५६ वर्षीय सिताराम तानु मोहिते यांचा मृतदेह पुलाखाली आढळून आलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, सिताराम मोहिते हे दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता दारू पिण्यासाठी घरातून बाहेर पडले, परंतु दिवसभर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांना काळजी वाटू लागल्याने त्यांचा जावई काशीराम हरेकर तसेच वाडीतील काही नागरिकांनी त्याचा शोध घेतला.
या शोधमोहीमे दरम्यान, दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास, नांदगाव गावकरवाडीच्या बाहेरून आंबेपालकडे जाणाऱ्या कॅनलच्या पुलाखाली मोहिते मृतावस्थेत आढळून आले. त्यांना पाहताच नागरिकांनी तात्काळ ही माहिती कुटुंबीयांना दिली.


घटनेची माहिती मिळताच त्यांचा जावई काशीराम हरेकर यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात खबर दिली. सावर्डे पोलिसांनी या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद (क्रमांक २७/२०२५) बी.एन.एस.एस. १९४ नुसार केली असून पुढील तपास सुरु आहे.


मोहितेंच्या अचानक मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी, तो दारू पिण्यासाठी बाहेर पडल्यावरच घडलेल्या या घटनेने गावात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पोलीस मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पंचनामा व तपासकार्य करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *