मंगळवारी जयस्तंभ ते कुवारबाव रिक्षा प्रवासादरम्यान रिक्षा चालकाने एका महाविद्यालयीन तरुणीशी असभ्य, अश्लील वर्तन केले. त्यानंतर तरुणीने सोशल मीडियावरील केलेल्या एका पोस्ट मुळे एकच खळबळ उडाली.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
त्या प्रसंगाच्या अनुषंगाने पोलिसांनीच पुढाकार घेत त्या तरुणीशी संपर्क साधला. आणि पोलिसांनीच या प्रकरणातील संशयित आरोपी रिक्षा चालक अविनाश म्हात्रे याला जेरबंद केले आहे. त्याची रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
तरुणीने टाकलेल्या सोशल मीडिया वरील पोस्टमुळे पोलिसांनी पुढाकार घेत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात घडलेला वृत्तान्त सांगितल्यानंतर अवघ्या दीड तासात पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
याबाबत शहर पोलिसांचे कौतुक केले जात आहे. कॉलेजवयीन तरुणी घरी परतण्यासाठी जयस्तंभ येथे गाडीसाठी उभी होती. या थांब्यावर कुवारबावच्या दिशेने जानारा संशयित रिक्षाचालक अविनाश म्हात्रे आला असता त्याच्या रिक्षात तरुणी बसली.
जयस्तंभ ते कुवारबाव असा प्रवास करीत असताना रिक्षाचालकाचे मागे बसलेल्या तरुणीसोबत असभ्य अश्लील वर्तन सुरू होते. ही घटना १३ जून २०२३ रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. तरुणीने भीतीपोटी सदर बाब कोणालाही सांगितली नव्हती.
मात्र १४ जून २०२३ रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी व मित्र परिवाराने थेट पोलिस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार पोलिसांच्या समोर उघड झाला.
रत्नागिरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिक्षाचालकाला पकडण्यासाठी दोन पथके स्थापन केली. दोन्ही पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी संशयीत रिक्षाचालकाचा शोध सुरू केला.
रत्नागिरी पोलिसांनी संशयित रिक्षाचालकाच्या दीड तासांमध्ये मुसक्या आवळल्या असून अविनाश म्हात्रे (अंदाजे वय ३५) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.
संशयित रिक्षाचालकाला शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. तसेच लैंगिक छळाचा (कलम ३५४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संशयित आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













