आरोग्य विभागाची 108 रुग्णवाहिका रुग्णांसाठी खूप महत्त्वाची ठरत असून नुकतेच 108 रुग्णवाहिकेत गरोदर मातेला उपचारासाठी रत्नागिरीत दाखल करत असताना महिलेची सुखरूप प्रसूती केलीय.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर ही प्रसुती झाली. डॉ. अनिकेत डिके यांनी प्रसंगावधान राखत सुखरूप प्रस्तुती केलीय.
संगमेश्वर 108 रुग्णवाहिका डॉ. अनिकेत डिके यांनी पेशंटच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली आणि विलंब न लावता पेशंट निधी तांबे यांना रूग्णवाहिकेत घेऊन रत्नागिरीच्या दिशेने जाण्यास निघाले असताना, रत्नागिरीपासून काही अंतरावर गेल्यावर सदर महिलेस प्रसुती कळा चालू झाल्या कुवारबाव येथे
रुग्णवाहिका पोचली असता या महिलेस तीव्र प्रसुती कळा चालू झाल्यामुळे डॉ. अनिकेत डिके यांनी सहाय्यक गणेश पाथरे यांना रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजुला थांबविण्यास सांगितले आणि रस्त्यातच प्रसुती करण्याचे ठरविले आणि काही मिनिटांमध्ये सुखरूप प्रसुती झाली निधी यांनी एका गोड अशा पुत्राला जन्म दिलाय.
बाळ आणि बाळाची आई यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, दोघंही सुखरूप आहेत. नातेवाईकांनी डॉ. डिके व सहाय्यक गणेश पाथरे तसेच 108 टीमचे आभार मानले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













