गणपतीपुळे : समुद्राला उधाण, लाटेत दुकाने उध्वस्त

banner 468x60

रत्नागिरी जवळील गणपतीपुळे येथे समुद्राला अचानक उधाण आलेले पाहायला मिळाले. समुद्राचे पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत घुसले.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

यावेळी पर्यटकांचे समुद्र किनारी ठेवले साहित्य वाहून गेले. तसेच समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचले होते.

बिपरजॉय चक्रीवादळच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आल्याचे दिसून येत आहे. बिपरजॉयया वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत.

ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येत आहे. समुद्राला सध्या उधाण नसलं तरी वाऱ्याचा वेग वाढलेला जाणवत आहे. त्यामुळे सध्या किनारपट्टी भागामध्ये खबरदारी देखील घेतली जातेय.

जिल्हा प्रशासनानं त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्यायत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातल्या किनारपट्टी भागामध्ये अलर्ट जारी केला आहे.

चक्रीवादळाचा परिणाम हा रत्नागिरीतील समुद्रात दिसून आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ हे पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकरले आहे. मात्र, पुढील 24 तासात हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *