चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांचा पक्ष व पदाचा राजीनामा

banner 468x60

चिपळूण नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया वेगात सुरू असताना भाजपच्या संघटनाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह जिल्हा उपाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षाचा त्याग केला असून या अचानक निर्णयामुळे स्थानिक भाजपमध्ये मोठी हालचाल आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या रणनीतीवर या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भोसले उद्या (रविवारी) पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरीत्या आपला राजीनामा जाहीर करणार आहेत. त्यामध्ये राजीनाम्यामागची कारणे तसेच पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची अपेक्षा आहे.

परिमल भोसले हे पक्षातील सक्रिय, भूमिकादर्शक आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या निर्णयामुळे चिपळूणच्या राजकारणात मोठे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *