चिपळूण तालुक्यातील चिंचघरी-खोतवाडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकल्याची घटना सोमवार दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या कारवाईत आठ जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मधुकर चाळके (३४, रा. चिंचघरी खोतवाडी), अरविंद गोविंद चाळके (४४, रा. चिंचघरी खोतवाडी), राकेश रमेश चव्हाण (३८, रा. दळवटणे रामवाडी), अतिक अहमद पांगरकर (४३, रा. कान्हे मोहल्ला), अमोल भालचंद्र अधटराव (३९, रा. सुवर्ण संकुल, सतीस्टॉप), दर्शन दिलीप बैंकर (२८, रा. पिंपळी खुर्द नाका), तेजस सदानंद पवार (३०, रा. अनारी गणेशवाडी), महादेव धोंडु झिमण (५४, रा. अडरे कान्हे फाटा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जाधव यांनी पोलिसांत दाखल केली आहे. मनोहर चाळके यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण गैरकायदा पद्धतीने पैसे लावून बावन्न पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून आठजणांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण १७ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आठजणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













