कोकण : ‘बिपरजॉय’मुळे कोकण किनारपट्टी भागात वातावरणात बदल

banner 468x60

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ अतितीव्र रुप धारण करण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


समुद्राजवळून 40-50 किमी तर कमाल 55 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. जोरदार पाऊस तसेच समुद्र देखील खवळलेला राहणार आहे.

यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘अलर्ट’जाहीर केला असून नागरिकांना 12 जूनपर्यंत सतर्पतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडुन मिळालेल्या पूर्व सूचनांनुसार अरबी समुद्रात बिपरजॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले आहे.

या वादळामुळे 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या कालावधीत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे जे मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले अशांनी तात्काळ समुद्रकिनारी परतावे अशा स्वरुपाच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

दरम्यान बंगालच्या उपसागरातील मोचा चक्रीवादळ आल्यानंतर नवीन वर्षातील दुसरे आणि अरबी समुद्रातील पहिले वादळ बिपरजाय सक्रिय झाले आहे. या अनुषंगाने या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार आहेत.

त्यासाठी नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (समुद्र चौपाटी) येथे जाणे टाळावे असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *