संगमेश्वर : शिकारी टोळके जेरबंद , चार संशयित ताब्यात

banner 468x60

वन विभागाच्या पथकाने मौजे राजवाडी (ब्राह्मणवाडी, साई मंदिरसमोर) येथे ६ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या गस्तीदरम्यान संशायस्पद फिरणारी एक बोलेरो पिकअप वाहन (एमएच ०८ एपी ८६२१ ) थांबवून झडती घेतली असता शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यासह चारजणांना अटक करण्यात आली.

banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झडतीदरम्यान १२ बोअर बंदूक, सहा जिवंत काडतुसे, दोन हँड टॉर्च आणि पिकअप वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत वाहनातील चौघेही शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याचे स्पष्ट झाले.


विश्वनाथ शांताराम मालप (वय २९, रा. अणदेरी, ता. संगमेश्वर), गजानन मानसिंग इंदुलकर (४३, रा. हेदली, ता. संगमेश्वर), रूपेश धोंडू पोमेंडकर (४१, रा. कारभाटले, ता. संगमेश्वर) आणि राहुल रवींद्र गुरव ( २८ , रा. तिवरे, घेरा प्रचितगड, ता. संगमेश्वर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.


याप्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) जी. गुरुप्रसाद (भा.व.से.), विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरिजा देसाई,

तसेच सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सूरज तेली, आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे यांनी सहभाग घेतला. तसेच पोलिस पाटील अणदेरी महेंद्र होडे, राजवाडी पोलीस पाटील विलास राऊत, सुलतान मालगुंडकर, अनंत तोरस्कर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *