गुहागर :कोकणची परंपरा जपली! गुहागरच्या तवसाळमध्ये ‘वाघबारस’ उत्सवाला तरुणाईचा उत्साह

banner 468x60

गुहागर : कोकणात अनेक वर्षांपासूनची परंपरेने चालत आलेली वाघबारस गुहागर तालुक्यातील तवसाळ गाव पंचक्रोशीमधील बाबरवाडी येथील वाघ बारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

banner 728x90

कार्तिकी द्वादशी सर्वात श्रेष्ठ मानली जाते. चातुर्मास्य समाप्ती होते. या दिवसा नंतर गुराख्यांच्या देवाची पूजा करतात. प्रत्येक

तालुक्यात गावात वाडी मध्ये वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते.तशी तवसाळ गाव पंचक्रोशी मधिल वाघबारसी सालाबादप्रमाणे यंदाही वाघबारशी मोठ्या उत्साहात साजरी केली.

अनेक वर्षांची परंपरा लोप पावत आहे. मात्र त्या लोक परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी आजची तरुणाई करताना दिसून येत आहे.


संपूर्ण वाडीतील लहान मुलांन पासून ते मोठ्या वयोवृद्धांन पर्यंत ग्रामस्थ, महिला मंडळ, नवतरून युवक, तरूणी मोठ्या उत्साहात संख्येने उपस्थित असतात.

जेवनाची तयारी करताना वाघ पिटळणे यासाठी रंगरंगोटी केली जाते. छोट्या मुलांना जंगली प्राणी बनवितात अंगावर कमरेभोवती झाडाची पाने,भाताचा पेंडा , डहाळ्या लावून सजून गुराख्यांच्या देवाला नैवेद्य दाखवला कि वाघ पिटळणे कार्यक्रम असतो शेवटी नदीत आंघोळ करून सर्वजण आनंद लुटतात.

अशारितीने वाघबारशी‌ वाघाला शिमेच्या बाहेर पिटाळून लावले जाते. देवाला गान्हाने घालण्यात येत….ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी देवीला विनवणी करतात.

वाघबारशी हा गुराख्यांचा कार्यक्रम असतो. आपल्या गुरांचं संरक्षण व्हावं, गुरांना सुख, समाधान मिळावं, रानात कुठलीही अडचण येऊ नये, म्हणून हा कार्यक्रम साजरा केला जातो.

त्या नंतर सर्व गुरे चरायला सोडून देतात अगदी मे महिन्यात पर्यंत तर तू रक्षण कर, अशी आराधना करून वनभोजन करून सांगता केली.

या वेळी तवसाळ बाबरवाडी मधील प्रतिष्ठीत
बाबरवाडीतील ग्रामस्थ अध्यक्ष संदीप जी जोशी उपस्थित होते शंकरजी येद्रे, विजयजी नाचरे ,गणपतजी येद्रे मोहन येद्रे यशवंत नाचरे ,गणू येद्रे ,अशोक नाचरे, आनंद येद्रे ,दिपक येद्रे, दिपक जोशी, ज्ञानेश रसाळ, सचिन येद्रे, अविनाश नाचरे,सुरेश येद्रे ,सुरेश नाचरे ग्रामस्थ महिला मंडळ यांचा मोठा सहभाग दिसून येतो. अशारीतीने वाघबारशी निमित्ताने ग्रामीण व कोकणची संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *