परतीच्या पावसामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लांजा शहरात ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका लांजावासीयांना बसून लाखो रुपयांचा नुकसान झालं आहे.
https://www.instagram.com/reel/DQhQeWKjZ1q/?igsh=c2ZoNHZnOHl6OWY3
लाखो रुपयांच्या नुकसानीनंतर ठेकेदार कंपनीकडून नुकसान भरपाईबाबत दिलेल्या आश्वासनावर घुमजाव सुरू झाल्याने नागरिकांनी थेट आक्रमक भूमिका घेत कंपनीच्या प्रतिनिधीला तहसीलदार कार्यालयात धारेवर धरले. तसेच येत्या दोन दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास गुरुवारी महामार्गाचे काम बंद पाडणार असा इशारा देण्यात आला.
सर्वात प्रथम लांजावासीयांच्या व्यथा कोकण कट्टा न्यूजने मांडल्या आणि यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामb सोशल मीडियावर 5 लाख व्यूज या बातमीला मिळाले.
शुक्रवारी रात्री ११ वाजल्या पासून शनिवारी पहाटे पर्यंत मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळे लांजा शहरातील महामार्गावर असलेल्या श्रीराम पुलाजवळील वहाळ शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तुंबले होते. यामध्ये आसपासच्या परिसरातील नागरिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. विशेषतः गेल्या सहा महिन्यातील याच परिसरातील ही चौथी घटना होती. तरी देखील ठेकेदार कंपनीने यासंदर्भात वेळोवेळी निष्काळजीपणा दाखवला असल्याने स्थानिक नागरिकांमधून रोष व्यक्त करत नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. त्यावेळेस नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीकडून देण्यात आले होते.
त्या पार्श्वभूमीवर सोमवारी ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला असता ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीने घुमजाव केला. यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी लांजा तहसीलदार कार्यालयावर धडक देत ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून धारेवर धरले. त्यावेळी निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी नरेश सितलानी यांना नागरिकांकडून चौफेर प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नागरिकांचा पारा आणखीनच चढला. परिणामी, नागरिकांनी दोन दिवसांचा अल्टीमेटम देत सांगितले की, जर बुधवार पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही तर गुरुवारी महामार्गाचे काम बंद पाडणार. याप्रसंगी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही अशी भूमिका उपस्थितांनी घेतली.
आमदार किरण सामंत यांच्यासमोर आश्वासन दिल्यामुळे या चर्चे दरम्यान आमदार किरण सामंत यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधण्यात आला. यावेळी आमदार सामंत यांनी सांगितले की, मी सद्ध्या मुंबईत असून दोन दिवसांत लांजात येणार आहे. जर सांगितल्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली नाही, तर मी स्वतः घटनास्थळी येऊन कारवाई करेन. असा सज्जड दम आमदार किरण सामंत यांनी ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीशी फोनवर बोलताना दिला. तसेच बाधित नागरिकांच्या आवश्यक असणाऱ्या गरजा तत्काळ पूर्ण करा असेही सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार कार्यालयात राजेश राणे, प्रकाश लांजेकर, अभिजित राजेशिर्के, पंढरीनाथ मायशेट्ये, बाबा धावणे, मंगेश लांजेकर, सचिन लिंगायत, सुरेश करंबळे, सलमान देवानी, मोहम्मद देवानी, मुकरम देवानी, अनिकेत शेट्ये, राजेश भडेकर, नौशाद नेवरेकर, साहिल इसानी, वसीम मुजावर, अब्दुलरहेमान मुजावर, मोहन तोडकरी, बाबू गुरव, रिजवान इसानी आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
यानंतर ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीला पाण्यामुळे झालेले नुकसान दाखवण्यासाठी घटनास्थळी बोलावपाण्यात आले आणि झालेले नुकसान दाखवण्यात आले. दरम्यान, ठेकेदार कंपनीने आमदारांच्या उपस्थितीत दिलेला नुकसानीच्या भरपाईचा शब्द पाळला नाही, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत ठेकेदार कंपनीने नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लावला नाही तर महामार्गाचे काम बंद पडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













