चिपळूण तालुक्यातील सावर्डे मार्केट परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका व्यक्तीला विनापरवाना कॉम्प्युटरवर ऑनलाईन जुगार खेळताना रंगेहाथ पकडले आहे. आरोपीकडून जुगारासाठी वापरलेले संगणक साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ९,६५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उमेश गणपत कांबळे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सावर्डे मार्केट, ता. चिपळूण येथे घडली. याप्रकरणी त्याच दिवशी रात्री १० वाजून ५ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावर्डे बाजारपेठ येथील रहिवासी शुभम मोहन सुर्वे (वय ३२) हा महाराष्ट्र जमीन कायद्याच्या १२(अ) स्तंभाचे उल्लंघन करून गैरकायदा आणि विनापरवाना जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.
आरोपी शुभम सर्वे हा कॉम्प्युटरवर ‘फन रुलेट’ नावाचा ऑनलाईन चक्री गेम जुगार खेळत असताना पोलिसांनी त्याला जागेवरच पकडले. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे: झेबस्टर कंपनीचा काळ्या रंगाचा मॉनिटर (चालू स्थितीत) – अंदाजित किंमत ३,०००/- रुपये.,पॉवर-एक्स कंपनीचा काळ्या रंगाचा सीपीयू (चालू स्थितीत) – अंदाजित किंमत ६,०००/- रुपये.,झेबिऑन कंपनीचा काळ्या रंगाचा की-बोर्ड (चालू स्थितीत) –
अंदाजित किंमत २००/- रुपये,झेबिऑन कंपनीचा काळ्या रंगाचा माऊस, अंदाजित किंमत १००/- रुपये,रोख रक्कम – ३५७/- रुपये. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ९,६५७/- रुपये इतकी आहे. आरोपी शुभम मोहन सुर्वे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गु.आर.क्र. १०६/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सावर्डे पोलीस अधिक तपास करत आहेत. ऑनलाईन जुगारासारख्या अवैध कृत्यांविरुद्ध पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













