चिपळूण : शिरगाव येथे वाशिष्ठी फाऊंडेशनची ‘सप्तसुरांची मैफिल’ रंगली, अपूर्वा किरण सामंत यांची उपस्थिती

banner 468x60

शिरगाव येथील वाशिष्ठी फाऊंडेशनतर्फे दिवाळी निमित्त आयोजित “सप्तसुरांची मैफिल” हा सांगीतिक कार्यक्रम कु. अपूर्वा ताई किरण सामंत यांच्या उपस्थितीत रंगला. यावेळी रसिक श्रोत्यांनी भावगीते, भक्तिगीते आणि लोकप्रिय मराठी गाण्यांचा मनमुराद आस्वाद घेतला.

banner 728x90

कार्यक्रमास चित्रकार व सिनेकला दिग्दर्शक देवदास भंडारे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. दीपप्रज्वलन, शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

अपूर्वा सामंत यांनी घेतले महाकाली देवीचे दर्शन

कार्यक्रमास उपस्थित राहण्यापूर्वी अपूर्वा ताई किरण सामंत यांनी शिरगाव-कुंभार्ली-पोफळी या तीन गावांच्या जागृत देवस्थान आई महाकाली देवीचे दर्शन घेतले.
या वेळी संदीपभाई कोलगे यांनी आप्पा गुरव यांच्या माध्यमातून सामंत यांच्याशी संपर्क साधून १८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या महाकाली देवी यात्रेस निमंत्रण दिले.
त्यावर सामंत यांनी वाशिष्ठी फाऊंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक करत “मी महाकाली देवीच्या यात्रेला येणार आहे” अशी घोषणा केली.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, माजी पंचायत समिती सदस्य. जागृती शिंदे, माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रकाश लब्ध्ये, शिरगाव सोसायटी चेअरमन जयंतराव शिंदे, माजी चेअरमन भाई शिंदे, माजी संचालक सतीशराव शिंदे, संचालक श्रीराम पवार, तंटामुक्त अध्यक्ष राजन शिंदे, तसेच प्रकाश उर्फ भाऊ मोहिते, बाबू मोहिते, संदीप भोसले, रविंद्र सकपाळ, विजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

सन्मान व प्रास्ताविक

कार्यक्रमात अपूर्वा ताई किरण सामंत यांचा सन्मान माजी पंचायत समिती सदस्य सौ. जागृती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
सुधीर शिंदे यांनी मनोगतातून वाशिष्ठी फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले, तर अध्यक्ष प्रकाश लब्ध्ये यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.

कलादिग्दर्शक देवदास भंडारे यांचा गौरव

कुंभार्ली गावचे सुपुत्र आणि सिने कलादिग्दर्शक देवदास काशीनाथ भंडारे यांचा फाऊंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांनी कलादिग्दर्शक या क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट करून वाशिष्ठी फाऊंडेशनच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले.

सुरांची रंगतदार मैफिल

या मैफिलीत अनिकेत चव्हाण, तृप्ती जाधव आणि मंगेश तांबे यांनी भावगीते, भक्तिगीते व मराठी गाण्यांच्या सुमधुर सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
संगीत साथ पंकज कसाले, संकेत नवरत, अनिकेत नवरत आणि सुरज लोहार यांनी केली, तर कार्यक्रमाचे उत्तम निवेदन चंदन शिवे यांनी केले.
ज्येष्ठ गायक श्रीराम पवार यांनी आई महाकाली देवीवर आधारित गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगदान

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी निसार शेख, राजू माचकर, हिदायत उर्फ बावा कडवेकर, रफिक शेख आणि अशोक लांबे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *