चिपळूण : शहरात ब्लॅकमेलिंगचा प्रकार वाढला, प्रेमाचं जाळं, मुलींचं होतंय ब्लॅकमेलिंग

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर हे सुसंस्कृत पर्यटन आणि शांततापूर्ण शहरापैकी एक असलेला शहर आहे. मात्र या शहरात सध्या दोन घटनांमुळे शहरात चर्चा सुरु आहे. बाळाची विक्री रॅकेट आणि सेक्स रॅकेट, ब्लॅकमेलिंगचा प्रकार समोर आला आहे. चिपळुणातील एका व्हॅन चालकाने अनेक मुलींना वेगवेगळ्या कारणाने ब्लॅकमेल केल्याची खात्रीलायक आणि विश्वसनीय सूत्रांनी कोकण कट्टा न्यूजला माहिती दिली आहे.

kokan katta news Whatsap join group

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DPwxHc9SqS13RpDBub7tE9

एका बाजूला सेक्स रॅकेट आणि बाळ विक्री रॅकेटच्या चर्चेने नागरिकांना अस्वस्थ केले असतानाच आता शाळा वाहन चालकाकडून विद्यार्थिनींचे ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हॅन चालक अनके मुलींची फसवणूक आणि त्यांचे फोटो, व्हिडिओ काढून त्यांना वेगवेगळ्या कारणाने त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे.

असाच प्रकार चिपळूणमधील एका मुलीसोबत घडला आहे. व्हॅन चालकाने या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ आहेत असं सांगून मुलीला ब्लॅकमेल करत असल्यामुळे याच व्हॅन चालकाला २४ ऑक्टोबरच्या रात्री गोवळकोट परिसरात काही युवकांनी चांगलाच चोप दिलाय. मात्र, या संदर्भात अद्याप अधिकृत तक्रार नोंद झालेली नाही. हा व्हॅन चालक शाळेमध्ये जाणाऱ्या मुला मुलींची ने आण करतो. मात्र या प्रकाराबाबत मुलीच्या घरच्यांनी कोणतीच तक्रार केली नाही. अश्या अनेक मुली आहेत जे या प्रकरणात अडकल्याची माहिती आहे मात्र बदनामी होईल या कारणाने कोणीही पुढे येत नाही.

अलीकडेच चिपळूणमध्ये एका खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच शाळेच्या व्हॅन चालकाने विनयभंग केला.या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, पालकवर्ग, शिक्षक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. हे प्रकरण ताजं असतानाच आता हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणात चिपळूण पोलीस नेमकी काय भूमिका घेणार या प्रकरणाचा छडा लावणार का असे अनेकानेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकीकडे राज्यात सुरु असलेल्या महिला आत्याचाराच्या घटना आणि चिपळूणमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये महिला मुली सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मात्र या सर्व प्रकरणात पीडित मुली जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत पोलीस देखील ठोस कारवाई करू शकणार नाही. काही मुलींनी अजूनही भीतीपोटी अधिकृत तक्रार केलेली नाही. त्यामुळे यामध्ये अडकलेल्या मुलींनी घाबरून न जाता पुढे येणं गरजेचं आहे तर अश्या नराधमांना योग्य शासन मिळेल. त्यामुळे पीडित मुलींनी न घाबरता समोर यावं तक्रार करावी आपल्या नावाबाबत गुप्तता पाळली जाईल, पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करेल असं आवाहन चिपळूण पोलिसांनी केलं आहे.


या घटनेनंतर अनेक पालकांनी शाळांच्या व्यवस्थापनांकडे, प्रशासनाकडे शाळा वाहन चालकांची पार्श्वभूमी तपासणी अनिवार्य करावी. सीसीटीव्ही कॅमेरे, महिला सहाय्यक यांची व्यवस्था शाळा वाहनांमध्ये करावी. पालक-शाळा संवाद प्रणाली अधिक मजबूत करावी.

वाहतूक यंत्रणांची नियमित तपासणी व सुरक्षा प्रशिक्षण असावे आणि चिपळूण पोलीस विभाग प्रकरणाचा कसून तपास करत असून, सर्व पुरावे गोळा करावेत अशी मागणी केली आहे. चिपळूण शहरात घडणाऱ्या या सलग घटनांमुळे चिपळूणच्या सुसंस्कृत प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांकडून या प्रकरणात तातडीने कठोर कारवाईची मागणी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *