गुहागर–रत्नागिरी एसटीचा आपत्कालीन दरवाजा उघडून महिला बाहेर फेकली, महिलेवर डेरवण येथे उपचार सुरू

Screenshot

banner 468x60

गुहागर गणेशखिंड–सावर्डे मार्गे रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने बसमधून एक महिला बाहेर फेकली गेली. ही घटना आज (रविवार) सकाळी घडली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

या घटनेत प्रियंका विनोद कुंभार या महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रियंका कुंभार या गुहागर–रत्नागिरी या एसटी बसने प्रवास करत असताना, दहिवली ते सावर्डे या दरम्यान ही दुर्घटना घडली.

banner 728x90

अपघाताची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख रुपेश घाग आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य केले.
या विचित्र प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने लोकांमध्ये चर्चा सुरू असून, “त्यांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती,” असे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *