रत्नागिरी जिल्ह्याच्या सावर्डे येथील गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमीची गुणवंत खेळाडू आफिया चिकटे हिची रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. पंधरा वर्षांखालील मुलींच्या वयोगटातील ही निवड असून, या निमित्ताने आफिया आता महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन (एम.सी.ए.)
मार्फत पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. नुकतीच रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे 15 वर्षांखालील वयोगटातील मुलींची निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीला जिल्ह्यातून असंख्य होतकरू खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सावर्डे येथील गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमीची विद्यार्थिनी आफिया चिकटे हिने रत्नागिरी जिल्हा संघात आपले स्थान निश्चित केले. मागील तीन वर्षांपासून ती प्रशिक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. ती सह्याद्री शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













