८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक
तवसाळ-गुहागर रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जिंदाल विद्या मंदिर प्रशालेच्या खेळाडूंनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत मोठे यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत तवसाळ गाव पंचक्रोशीतील मोहिते वाडीचा रहिवासी आणि जिंदाल विद्या मंदिर, रत्नागिरीचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. यशवर्धन विजय मोहीते याने आपले कौशल्य सिद्ध केले.
यशवर्धन मोहिते याने १७ वर्षांखालील गटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. या दैदिप्यमान यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तवसाळ गाव पंचक्रोशीच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यशवर्धनसह या सर्व यशस्वी खेळाडूंची आता जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या विजयी खेळाडूंचे शाळेचे पर्यवेक्षक दिपक दरडी, शालेय व्यवस्थापन
समितीचे अध्यक्ष विजय इंगवले आणि सर्व शिक्षकांनी विशेष अभिनंदन केले आहे. यशवर्धनच्या या यशामुळे जिंदाल विद्या मंदिरचा आणि तवसाळ पंचक्रोशीचा लौकिक वाढला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













