गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई–गोवा महामार्गाच्या कामामुळे त्रस्त झालेल्या कोकणवासियांच्या मनातील आक्रोश आता एका तरुणाच्या रूपाने जनतेसमोर येत आहे. कोकणातील सुजाण तरुण. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी या समस्येवर आवाज उठवत “रस्ता सत्याग्रह” सुरू केला आहे.
या आंदोलनाचा भाग म्हणून चैतन्य पाटील यांनी मुंबई ते गोवा असा पायी प्रवास सुरू केला असून, त्यांच्या या प्रवासाच्या १७ व्या दिवशी सावर्डे येथे त्यांची भेट घेऊन समृद्ध कोकण संघटनेचे अनिष संतोष निंबकर यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जनतेच्या सुरक्षित प्रवासासाठी, उत्तम रस्त्यांसाठी आणि प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी चैतन्य पाटील यांचा हा संघर्ष खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे रूप धारण करीत आहे.
अनिष निंबकर यांनी म्हटले की, “रस्ता हा जनतेचा हक्क आहे — आणि या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाला आपण साथ दिली पाहिजे. चैतन्यच्या प्रयत्नांना कोकणातील प्रत्येकाने साथ द्यावी.”

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













