रायगडचा इतिहास अनेक वर्ष हुबेहूब मांडणारे तब्बल 22 गाईडना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
माननीय मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्यावतीने रायगडच्या गाईड लोकांना आरोग्य मदतीचा हात दिला आहे.
किल्ले रायगडावरील एकूण 22 गाईड येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगतअसतात.
अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत सर्व गाईड मंडळी रायगडवर निस्सीम प्रेम करत पराक्रमी इतिहास रोज सांगतअसतात. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने दरवर्षी ड्रेस कोड प्रदान केला जातो तसेच, मूर्ती पूजनाचे साहित्य दिले आहे.
खासदारडॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून रायगड पाच हार 2021 पासून सुरू आहेत. त्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे गाईड लोकांना आरोग्य विमा संरक्षण.
यामध्ये रायगड गाईड संघटनेचे पप्पू औकिरकर (अध्यक्ष), रामचंद्र अवकीरकर, संदीप ढवळे, सखाराम अवकीरकर, संदीप शिंदे, सुनील शिंदे, दिलीप अवकीरकर, निलेश ऑकिरकर, गणेशझोरे, सुनील अवकीरकर, मनेश गोरे, सिताराम अवकीरकर, सुरेश आखाडे, अंकेश अवकीरकर, बाळाराम महाबळे, प्रदीपअवकीरकर, सिताराम झोरे, लक्ष्मण अवकीरकर,
आकाश हिरवे, रमेश अवकीरकर, सागर काणेकर, चंद्रकांत अवकीरकर अशाएकूण 22 गाईड लोकांचा समावेश आहे.
वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजार समावेश आहे. यामध्ये गाईडच्याकुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे.
2 जून रोजी 350 व्या शिवराज्याभिषेक मुख्य सोहळ्याच्या दिवशी आरोग्यविमा संरक्षण पत्र सर्व गाईड लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिले जाणार आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*