चिपळूण नगर परिषदेच्या 28 जागांसाठी आरक्षण जाहिर सर्व पाहा

banner 468x60

चिपळूण नगरपरिषदेच्या 14 प्रभागातील 28 जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात ही आरक्षण सोडत झाली. या सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 8 जागा निश्चीत केल्या. यातील 4 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.

banner 728x90

सर्वसाधारण महिलांसाठी 9 जागा, सर्वसाधारणसाठी 10 आणि अनुसुचीत जाती महिलांसाठी 1 जागा जाहीर करण्यात आली.

त्याप्रमाणे प्रभाग 1 (गोवळकोट) मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग 2 ( गोवळकोट रोड) मध्ये नामाप्र महिला व सर्वसाधारण, प्रभाग 3 (पेठमाप) नामाप्र महिला व सर्वसाधारण, प्रभाग 4 (उक्ताड) नामाप्र व सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 ( वाणीआळी) नामाप्र व सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 (मुरादपूर शंकरवाडी) नामाप्र महिला व सर्वसाधारण, प्रभाग 7 (मार्कंडी) नामाप्र व सर्वसाधारण महिला,

प्रभाग 8 (काविळतळी वांगडे मोहल्ला ) सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग 9 (राधाकृष्णनगर) सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग 10 ( रॉयलनगर) नामाप्र महिला व सर्वसाधारण, प्रभाग 11 (खेंड बाजारपेठ ) अनुसुचीत जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग 12 ( पागमळा विरेश्वर कॉलनी ) सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग 13 ( रावतळे ओझरवाडी) नामाप्र व सर्वसाधारण महिला, प्रभाग 14 (पाग) सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *