रत्नागिरी : कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा

banner 468x60

बदलत्या वातावरणामुळे कोकण किनारपट्टीला (Konkan) वारंवार चक्रीवादळाचा (Cyclone) तडाखा बसत आहे.

वादळापासून किनारी भागाचे मानवी वस्तीला संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर तीन ठिकाणी सायक्लॉन सेंटर (Cyclone Centre) उभारण्याचा निर्णय झाला.


याला पाच वर्षे झाली. त्यानंतर तौक्ते, निसर्ग, महान अशी तीन चक्रीवादळे येऊन गेली तरी या सायक्लॉन सेंटरला मुहूर्त काही मिळालेला नाही.


२०१८ मध्ये जिल्ह्यातील दाभोळ, हर्णै, सैतवडे या तीन ठिकाणी प्रत्येक ३ कोटीचीही सायक्लॉन सेंटर मंजूर झाली. पत्तन विभागामार्फत या सेंटरच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या.


एकदा नव्हे तर दोनवेळा निविदा मागवूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जी प्लस थ्री असे या सायक्लॉन सेंटरेच स्ट्रक्चर होते.


चक्रीवादळातही किनारी भागातील नागरिक या सेंटरमुळे सुरक्षित राहणार आहेत.
३ कोटीवरून या सेंटरची नवीन एस्टिमेट १५ कोटीवर गेले तरी त्याला मंजुरी मिळालेली नाही.

यावरून शासकीय यंत्रणेमध्ये सेंटर उभारणीबाबत किती उदासीनता आहे, हे स्पष्ट झाले आहे.
शासनाच्या या दिरंगाईमुळे जिल्ह्याच्या किनारी भागातील रहिवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.


फयान चक्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टीवर थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली.


भविष्यात अशाप्रकारे चक्रीवादळ आली तर किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित आसरा मिळावा यासाठी सायक्लॉन सेंटरला शासनान मंजुरी दिली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *