महाड : किशोरी विकास प्रकल्पांतर्गत महाडमध्ये ‘किशोरी उत्सव’ उत्साहात साजरा

banner 468x60

महानगर गॅस लिमिटेड आणि सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्प अंतर्गत ‘किशोरी उत्सव’ महाड येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

banner 728x90


महाड तालुक्यातील दहा किशोरी वर्गांतील २१० मुली व त्यांच्या मातांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थितीची नोंद केली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून —
डॉ. वैशाली मिंडे (सदस्य, जिल्हा थॅलेसिमिया जनजागरण समिती),
विजयजी चिमणकर (Rotary Club of Raigad Fort व Administrator – Raigad College of Pharmacy, Mohopre, तसेच विज्ञान भारती रायगड जिल्हा संयोजक),
गौरी मेहंदळे (सहकार्यवाहिका, राष्ट्रसेविका समिती),
साधना गांधी (सदस्य, राष्ट्रसेविका समिती),
रेश्मा सावंत (रायगड जिल्हा युवती प्रमुख),
आरती देशमुख (सदस्य, राष्ट्रसेविका समिती),
तसेच शिरगाव-केंबुर्ली गावच्या सरपंच आणि मेहंदी प्रशिक्षक नंदा पाटील उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर ‘मासिक पाळी’ या संवेदनशील विषयावर सावित्री किशोरी वर्ग, नवे नगर येथील मुलींनी प्रभावी नाट्यप्रस्तुती सादर केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरी प्रमुख पूजा जाधव हिने केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला.


सेवा सहयोग फाउंडेशनची ओळख व कार्यक्रमाची प्रस्तावना किशोरी विकास प्रकल्प, महाड समन्वयक मनाली तलाठी हिने केली. त्यानंतर सर्व किशोरी मुलींना त्यांच्या मातांनी औक्षण केले आणि मुलींनी मातांचे आशीर्वाद घेतले — आई-मुलीच्या नात्यातील स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
यानंतर आई-मुलगी जोडी स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा घेण्यात आली. १२ प्रश्नांच्या या स्पर्धेत अचूक उत्तर देणाऱ्यांना पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर किशोरी मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, आणि शेवटी सर्वांनी मिळून भोंडला साजरा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपण
कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वयन मनाली तलाठी, सुनीता तळेकर, भाग्यश्री देशमुख, सानिका मांडवकर, पूजा जाधव, अदिती चव्हाण आणि तेजू मोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *