चिपळूणमध्ये थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यावर घरमालक व त्याच्या कुटुंबीयांनी काठीने मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता चिपळूण शहरातील सालीहा मंजिल, सेकंड फ्लोअर, पेठमाप मुकादम मोहल्ला येथे घडली.
फिर्यादी विवेक लक्ष्मण पवार (वय ३७, रा. गांधी नगर, बहादूर शेखनाका, चिपळूण) हे वरिष्ठ अधिकारी अंकूश घाटाळ यांच्या आदेशाने थकीत बिल वसुलीसाठी आरोपींच्या घरी गेले होते. तेथे ग्राहक क्रमांक 219010310824 व मीटर कनेक्शन क्र. 03904299145 थकबाकी असल्यामुळे तोडण्यात आला.
यावेळी घरातील वफा साजिद मुकादम यांनी अचानक बांबूच्या काठीने मीटरवर मारून नुकसान केले. त्यानंतर त्याच काठीने फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार केला. फिर्यादी यांनी फटका चुकवण्याचा प्रयत्न केला असता काठी त्यांच्या उजव्या कानावर बसून दुखापत झाली.
त्यानंतर साजिद ए. रज्जाक मुकादम हे देखील गेटजवळ आले. त्यांनी फिर्यादी व अधिकारी घाटाळ यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून “तुम्हाला बघून घेतो” अशी धमकी दिली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.
या प्रकरणी गु.र. नं. 217/2025 नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 121(1), 132, 352, 351(2), 324(3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी :
1.साजिद ए. रज्जाक मुकादम
2.वफा साजिद मुकादम
(दोन्ही रा. सालीहा मंजिल, सेकंड फ्लोअर, फ्लॅट नं. 3, पेठमाप मुकादम मोहल्ला, चिपळूण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













