खेडचा सुपुत्र आयुष खरात याची महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघात निवड

banner 468x60

खेड तालुक्यातील आवाशी भेंडेवाडीचा तरुण आयुष संतोष खरात याने क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून महाराष्ट्र ऑल इंडिया टेनिस क्रिकेट संघात थेट निवड मिळवली आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष वसंत खरात यांचा सुपुत्र आयुषने आपली मेहनत व चिकाटीने खेळाडूंसाठी आदर्श ठरवत गावाचा आणि तालुक्याचा संपूर्ण देशात नावलौकिक वाढवला आहे.

banner 728x90


अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील अकुलज येथे संपन्न झालेल्या ७ वी अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धेत आयुषने उत्कृष्ट प्रदर्शन करत संघटकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्याच्या दमदार खेळाच्या जोरावर थेट ऑल इंडिया महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे.


आयुष पुढील काही दिवसांत उत्तरप्रदेशातील मधुराधाम येथे होणाऱ्या ऑल इंडिया महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप २०२५-२०२६ मध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी यांच्या वतीनेही आयुष याचा विशेष गौरव करण्यात आला असून त्याच्या उज्ज्वल भविष्याची सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.


खेड तालुक्याचा अभिमान बनलेला आयुष खरात आपले कर्तृत्व वाढवत क्रीडा क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *