रत्नागिरी : भक्ती मयेकरचा मोबाईल सायली बारमधून पोलिसांच्या हाती, मोबाईलमधून उलगडणार अनेक रहस्ये

banner 468x60

रत्नागिरी वाटद-खंडाळा येथील दुहेरी खुनप्रकरणात मोठी भर पडली आहे. सायली देशी बारमधून अखेर भक्ती मयेकरचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून, या मोबाईलमधून या गुन्ह्याचे अनेक धागेदोरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

banner 728x90

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मोबाईलमधील कॉल डिटेल्स, चॅटिंग तसेच सिताराम वीरसोबत झालेल्या संभाषणाचे पुरावे तपासात महत्वाची भूमिका बजावतील. मोबाईलचे सीडीआर तपासल्यानंतर संशयितांविरोधात ठोस पुरावे हाती लागण्याची अपेक्षा आहे.

गुन्ह्याची पार्श्वभूमी
सायली बारचा मालक दुर्वास पाटील याचे भक्ती मयेकरसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, भक्ती सतत लग्नासाठी दबाव टाकत असल्याने त्याने विश्वास पवार आणि सुनील नरळकरच्या मदतीने १६ ऑगस्ट रोजी बारमध्येच वायरने गळा आवळून तिचा खून केला. मृतदेह आंबाघाटात फेकण्यात आला होता.

याआधी २९ एप्रिल २०२४ रोजी सिताराम किर याला फोनवरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर राकेश जंगम हा पोलिसांना माहिती देईल या भीतीने त्याचाही खून करण्यात आला होता.

आता भक्ती मयेकरचा मोबाईल हाती आल्याने या प्रकरणातील अनेक अज्ञात धागेदोरे स्पष्ट होण्याची शक्यता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *