चिपळूण तालुक्यातील अलोरे देऊळवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 70 वर्षीय वयोवृद्ध महिला सुमित्रा गणपत चव्हाण यांचा मृतदेह घरातच कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
शेजाऱ्यांना आला दुर्गंधीचा वास
सुमित्रा चव्हाण या काही दिवसांपासून अल्पशा आजाराने त्रस्त होत्या. त्या घरात एकट्याच राहत असल्यामुळे त्यांच्या निधनाची माहिती कोणालाच मिळाली नव्हती. मात्र घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबाला घरातून दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने संशय आला.
याबाबत त्यांनी गावचे माजी सरपंच गजानन चव्हाण यांना माहिती दिली. त्यानंतर शिरगाव पोलिस ठाण्याला घटनेची खबर देण्यात आली.
दोन मुली मुंबईत वास्तव्यास
सुमित्रा चव्हाण आपल्या सावत्र मुलगा मोहन चव्हाण यांच्यापासून विभक्त राहत होत्या. त्यांना दोन विवाहित मुली असून त्या मुंबईत वास्तव्यास आहेत.
दोन्ही मुली वारंवार येऊन त्यांची विचारपूस व उपचार करीत असत. 28 ऑगस्ट रोजीही दोघी त्यांना भेटून गेल्या होत्या. प्राथमिक अंदाजानुसार, 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान त्यांचे निधन झाले असावे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिस ठाण्याचे स.पो.नि. भरत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन अलोरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास शिरगाव पोलिसांकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*