रत्नागिरी : चर्मालय येथे डंपर- दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी शहरात काल २६ ऑगस्ट संध्याकाळी एक दुःखद घटना घडली. चर्मालयजवळ झालेल्या भीषण अपघातात डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महेश घडशी (वय २१, रा. शिरगाव तिवेंडेवाडी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र ओंकार सनगरे (वय २२) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

banner 728x90


ही घटना संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली. मयत मयूर आणि जखमी ओंकार हे दोघे मित्र दुचाकीवरून डीमार्ट येथे काही खरेदी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. मयूरला वाचवण्याची संधीही मिळाली नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.


अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी ओंकारला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, डंपर चालकाचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मयूरच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरात वाढणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *