संगमेश्वर : कातूर्डी संगमेश्वर एसटी कोंड उमरे येथे घसरली, रिक्षाला साईट देताना अपघात

banner 468x60

संगमेश्वर येथे कातूर्डी संगमेश्वर एसटी कोंड उमरे येथे घसरून अपघात झाला आहे. रिक्षाला साईट देताना हा अपघात झाला आहे.

banner 728x90

आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास कातूर्डी हुन संगमेश्वर कडे येणारी परिवाहन मंडळाची गाडी कोंड उमरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढे आली असता समोरून सुसाट आलेल्या रिक्षाला साईट देताना चालकाने प्रसंगवधान दखवल्याने मोठा अपघात टाळला असला तरी गाडी रोड साईटला कळंडली, या वेळी गाडीत पन्नासहुन अधिक प्रवाशी होते, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.


आठ दिवसापुर्वी संगमेश्वर हुन कातूर्डी कडे जाणाऱ्या एसटिला कारभाटले नजीक समोरून येणाऱ्या महेंद्रा टेम्पोने धडक दिली होती, त्यामधे टेम्पो चालक गम्भीर जखमी झाला होता, तर दोनही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.

शास्त्री पूल ते नायरी, निवळी, कातूर्डी हा मार्ग अरुंद असुन वळना वळणाचा असुन समोरून येणारे वाहनाला अंदाज येत नाही. आणि रसता मोकळा दिसल्याने चालक बिनधास्त पणे सुसाट वाहन हाकत असतात. आणि अपघाताला निमंत्रण देत आहेत.

वरील दोनही अपघात समोरील चालकांच्या हलगर्जी पणा मुळे झाले असले तरी अणेक वेळेला पर जिल्ह्यातील आलेले एसटी चालक देखलील या मार्गावर सुसाट एसटी चालवत असल्याचे अणेक वाहन चालकांचे आणि प्रवाशी व ग्रामस्थ्यांचे म्हणणे आहे.

देवरुख आगार प्रमुखांनी या चालकांना सूचना द्याव्यात अशी मांगणी पुढे येत आहे.

उमरे मार्गावर सुसाट एसटी चालकांना कळंबस्ते तेले वाडी येथील ग्रामस्थानी समज दिल्याचे समजते.

तरी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मधे लक्ष घालून लोकांच्या आणि प्रवाशांच्या जीवlशी खेळणाऱ्या चालकांना योग्यती समज द्यावी अशी मांगणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *