दापोली : कुंभवे येथे रानभाज्यांची रानमाया उत्साहात पार

banner 468x60

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत कुंभवे येथे २७ जुलै रोजी आजच्या फास्ट-फूड च्या जमान्यात रानभाज्यांचे औषधी महत्व अधोरेखेत करण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन आणि रानभाज्या पाककृती स्पर्धा* याचे आयोजन केले.

प्रदर्शनामध्ये ५० हून अधिक भाज्यांचा सहभाग होता. तसेच २९ पाककृती या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी डॉ. आर. सी. गजभिये, सहयोगी अधिष्ठाता उद्यानविद्या महाविद्यालय दापोली, डॉ. एम. एम. कुलकर्णी, डॉ. सैतवाल तसेच कुंभवे गावचे सरपंच. लक्ष्मण झाडेकर व इतर प्रमुख अतिथी उपस्थित होते.

banner 728x90

पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. रूपाली तांबे, द्वितीय क्रमांक मनिषा शिगवण व तृतीय क्रमांक. शमिका जोग यांनी पटकावले. त्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *