ग्रामिण भागातील नागरीक आरोग्य सेवांपासून
वंचीत राहू नयेत या उद्देशाने राज्यशासनाने हाती घेतेलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाची सुरुवात 1 मे 2023 रोजी मंडणगड येथे करण्यात आली.
सार्वजनीक आरोग्य सेवा देणारा आणखी एक दवाखाना मंडणगड मध्ये सुरु झाल्याने शहरासह तालुकावासीयांना ग्रामिण रुग्णालयासह आपला दवाखाना हा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आमदार योगेश कदम यांच्या हस्ते दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी सभापती भाई पोस्टुरे, आदेश केणे, अनंत लाखण, रामदास रेवाळे, तहसिलदार विजय सुर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, डॉ. उदय नागपुरे, नगरसेवक विनोद जाधव, योगेश जाधव, प्रविण जाधव,
मुश्ताक दाभिळकर, संजय रेवाळे, संतोष पार्टे, इरफान बुरोंडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील या दवाखान्याचे संचालन नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*