खेड : लोटे एमआयडीसीत स्फोट समीर खेडेकरमृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

banner 468x60

खेड लोटे एमआयडीसीमधील विनंती ऑरगॅनिक्स लिमिटेड या कंपनीत घडलेल्या भीषण अपघातात समिर कृष्णा खेडेकर (वय ३९, रा. घाणेखुंट गवळीवाडी, ता. खेड) या कामगाराचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेला कंपनीच्या व्यवस्थापनाची निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या बाबतीत दाखवलेली दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

banner 728x90

याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सराफ, महादेव महिमान, सुरेंद्र जाधव व जयंत भगत (सर्व रा. विनती कॉलनी, धामणदेवी, ता. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सचिन मधुकर गवळी (वय ४५, रा. घाणेखुंट गवळीवाडी) यांनी दिली.

या प्रकरणी कंपनीच्या मालकांपासून ते प्लॉट इंचार्जपर्यंत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी कामगार संघटनांकडून होत आहे.
मयत समिर कृष्णा खेडेकर हे आयसो ब्यूटिल प्लॉट येथे काम करत असताना थरमिक फ्लुइड हिटरच्या हवेच्या दाबामुळे एअर प्री-हिटरच्या केसिंगचा पत्रा फुटून थेट त्यांच्या डोक्याला लागला. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


हा प्रकार गुरुवारी (दि. २६ जुलै) सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास घडला. विशेष म्हणजे, कंपनीच्या व्यवस्थापनाने कोणतीही सुरक्षात्मक साधने, यंत्रणा अथवा उपाययोजना उपलब्ध करून न देता कामगाऱ्यांना धोकादायक परिस्थितीत कामाला लावल्याचा आरोप सचिन गवळी यांनी केला आहे.


या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात विनोद सराफ, महादेव महिमान, सुरेंद्र जाधव व जयंत भगत (सर्व रा. विनती कॉलनी, धामणदेवी, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेनंतर लोटे एमआयडीसीमधील औद्योगिक सुरक्षेच्या पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकाराकडे संबंधित प्रशासन आणि कामगार विभाग गंभीर दखल घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *