चिपळूण शहरातील बुरूमतळी येथील मुख्य रस्त्यावर भटक्या कुत्र्याने थेट रिक्षा चालकाने पकडलेल्या स्टेअरिंगवरच उडी घेतल्याने रिक्षा पलटी झाली. रिक्षेचा वेग कमी असल्याने आणि समोरून कोणते वाहन न आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
या रिक्षात एक वयोवृद्ध महिला प्रवासी होत्या. या प्रकारामुळे त्या घाबरल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र चालकासह प्रवासी महिला सुखरूप आहेत, परंतु या अपघातात त्या कुत्र्याचा मृत्यू झाला.
चिपळूण तालुक्यातील टेरव येथील परेश काणेकर हे ताब्यातील रिक्षा घेऊन चिपळूणच्या दिशेने निघाले होते. या रिक्षामध्ये वयोवृध्द महिला बसल्या होत्या.
शहरातील पाग पॉवर हाऊस ते चिंचनाका या रस्त्यावरून जात असताना बुरूमतळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोर अचानक एका कुत्र्याने थेट रिक्षात उडी घेतली. तो कुत्रा स्टेअरिंगवरच आदळल्याने आणि अचानक हा प्रसंग घडल्याने परेश काणेकर गोंधळून गेले. त्यांनी रिक्षा सावरण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्र्याच्या धक्क्याने त्यांच्या हातातील स्टेअरिंग फिरले आणि रिक्षा पलटी होऊन अपघात झाला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*