रत्नागिरी : ‘बघतोस काय’ एवढं म्हटलं लोखंडी रॉड डोक्यात मारत हल्ला

banner 468x60

रत्नागिरी शहरातील जे. के. फाईल येथे ‘बघतोस काय’ अशी विचारणा केल्याच्या रागातून लोखंडी रॉड डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी

banner 728x90

दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कय्युम फारुख खान (वय २६) व मारुफ फारुख खान (वय २५ दोघेही रा. कोकणनगर, मराठी शाळेजवळ, रत्नागिरी. मुळ र. हाथियागड, ता. पुरंदरपूर, जि. महाराजगंज, राज्य उत्तरप्रदेश ), अशी संशयितांची नाव आहेत. ही घटना शनिवारी (ता. १२) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रम्यनगर, जे. के. फाइल्स कंपनीसमोर रमाकांत शर्मा यांच्या साईटवर, रत्नागिरी येथे घडली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धेश रमेश यादव (वय २३, रा. माऊली बंगला, शांतिनगर, रसाळवाडी-रत्नागिरी) हे त्यांचा मित्र इमरान कासीम सय्यद यांची लादी बसविण्याच्या कामाची मजूरी आणण्यासाठी मित्र इमरान सय्यद व राज घोरपडे यांच्यासह रमाकांत रामजीलाल शर्मा यांच्या साईटवर नवीन बांधकाम चालू असलेल्या बंगल्याचे पहिल्या मजल्यावर गेले असता त्या ठिकाणी मारुफ खान व त्याचा मित्र इमरान सय्यद यांनी तुझे येथे काय काम आहे असे विचारले असता संशयित मारुफ खान याने त्यांची

लादी बसविण्याचे काम चालु आहे. असे बोलून रागाने फिर्यादी व त्यांचा साथीदार इमरान सय्यद यांचेकडे बघू लागले. म्हणून फिर्यादी यांनी त्याला काय बघतोस, असे विचारले असता त्याने फिर्यादी सिद्धेश यादव याला शिवीगाळ करण्यात सुरुवात केली.

त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र पहिल्या मजल्यावरुन खाली उतरुन दुचाकी जवळ थांबले होते. त्यावेळी संशयित कय्युम खान याने संशयित मारुफ याला खाली बोलवून दुचाकीतून आणलेल्या लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डोक्यात लागोपाठ तीन वेळा मारुन दुखापत केली. कय्युम खान पुन्हा रॉड मारत असताना फिर्यादी यांचा मित्र राज घोरपडे व इमरा सय्यद यांनी तो रॉड पकडून संशयितालाही पकडेल.

त्यानंतर साईडवरील ठेकेदार आदीनाथ कांबळे यांनी येथे भानगड करु नका असे सांगून पोलिसाना फोन केला. पोलिस दाखल झाल्यावर जखमी सिद्धेश याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे पोलिस चौकीत या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सिद्धेश यादव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *