चिपळूण कराड मार्गावर दरम्यान वॅगनर आणि श्रेयस लकझरी बस मध्ये झालेल्या समोरा समोर झालेल्या भीषण अपघातात वॅगनर कार मधील एकाचा मृत्यू झाला आहे. वॅगनरमधून चिपळूण कापसाळ येथील एका लग्नाला जात असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा शुक्रवारी मध्यरात्री उशिरा हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात वॅगनर गाडी मधील पुणे येथील राजेंद्र चिंतू राऊत जागीच ठार झाले. वॅगनर मधील इतर तिघेजण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात हॉटेल निसर्ग समोर झाला.याबाबत सविस्तर वृत्त असे की पुण्यातील जैन हायस्कूल मधील एका शिक्षकाच्या मुलीचे लग्न कापसाळ येथे होते. त्यासाठी तिचे काही सहकारी पुण्याहून वॅगनआर गाडी क्रमांक एम एच १४..ईवाय ७६६३ घेऊन लग्नाला येत होते. प्रीतम तावरे हा गाडी चालवत होता तर त्याच्या पुढच्या सिटवर राजेंद्र राऊत बसले होते तर मागील सिटवर दादासाहेब अडसुळे,राजेश सोदा हे बसले होते. यावेळी गाडी कुंभार्ली घाट उतरून चिपळूण कडे येत असताना हॉटेल निसर्ग समोर रत्नागिरीहुन पुणे कडे जाणारी श्रेयस लक्झरी बस एमएच ११ एच ४७७६ ही गाडी समोरून आली आणि दोन्ही गाडीची समोरासमोर जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये एकाचा मृत्यू झाला.राजेंद्र राऊत यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दादासो अडसुले,राजेश सोदा,प्रीतम तावरे जखमी झाले अधिक उपचारासाठी चिपळूण येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, श्रेयस लक्झरीचा बस चालक निकेतन मंचेकर रत्नागिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण : लग्नासाठी कोकणात निघालेले, कार आणि बसची धडक
Read Also
Recommendation for You
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झालं आहे….
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झालं आहे….
चिपळूण – गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल,गोवळकोट…
चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण नजीक असुर्डे येथे मुंबईवरून गोव्याकडे जाणारी गाडी दरीत कोसळली असून…