चिपळूण येथील अरिबा मुबीन राजिवटे हिने NEET-UG 2025 या अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत 91 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे चिपळूणसह संपूर्ण कोकणात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
अरिबा ही रोटरी कॉलेज, खेडची विद्यार्थीनी असून तिचा अभ्यासातील सातत्यपूर्ण प्राविण्य पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. याआधी दहावीच्या महाराष्ट्र बोर्ड परीक्षेतही तिने 93 टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले होते.
अरिबा ही बालपणापासूनच अभ्यासू, हुशार आणि चिकाटीची विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. तिच्या यशामागे कुटुंबियांचे, शिक्षकांचे आणि तिच्या मेहनतीचे मोठे योगदान आहे.
विशेष म्हणजे अरिबा ही साहित्य व रंगभूमी क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यानुरागी महंमद झारे यांची नात असून, त्यांच्या सांस्कृतिक वारशाची ही नवी पिढी आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत आहे.
संपूर्ण जिल्ह्यातून आणि शैक्षणिक क्षेत्रातून अरिबावर कौतुकाचा वर्षाव होत असून विविध स्तरावर तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*