चिपळूण : क्रेडिट कार्डचे आमिष दाखवून वृद्धाला 6 लाखांचा ऑनलाइन गंडा

banner 468x60

लाईफ टाईम क्रेडिट कार्डसाठी पुरविलेल्या माहितीतून येथील एका सेवानिवृत्त वयोवृद्ध व्यक्तीची तब्बल ६ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना २० मार्च २०२५ रोजी शहरातील बहादूरशेख नाका येथे घडली. याप्रकरणी अनोळखी दोन व्यक्तीवर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90


याबाबतची फिर्याद विजय हरी बापट (७२, रा. परांजपे स्कीम एफ-२, बहादूरशेख नाका, चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस स्थानकात दिली. त्यांचे आयडीबीआय बँक शाखा चिपळूण येथे जॉईंट अकाऊंट व सेव्हिंग अकाऊंट आहे. फेसबुक या सोशल मीडियावर आलेल्या लाईफ टाईम क्रेडिट कार्डच्या एका जाहिरातीवर क्लिक करून बापट यांनी १९ मार्च २०२५ रोजी फॉर्ममध्ये स्वत:ची माहिती भरली होती.


२० मार्च रोजी त्यांच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तींनी फोन करून तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का, असे त्यांना विचारले. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीला बापट यांनी एटीएम कार्डची सर्व माहिती पुरवून पिन नंबरही सांगितला. त्यानंतर त्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गेल्याचे बँकेच्या अॅपमधून दिसून आले.

त्यांनी याबाबत खात्री केली असता त्यांच्या बचत खाते व मुदत ठेवीतील एकूण ६ लाख रुपये ऑनलाइन काढून घेऊन घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दिलेल्या

तक्रारीवरून चिपळूण पोलिस स्थानकात मोबाइलवरून संभाषण करणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *