दापोली पुणे शिवशाही बसला अपघात, 7 जखमी, याच मार्गावर पुन्हा दुसरा अपघात

banner 468x60

रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या मार्गावर महाड तालुक्यातील रेवतळे आंग्रे कोंड जवळ जाळीच्या देवाच्या ठिकाणी दापोली पुणे शिवशाही बस रस्त्यावरून घसरून अपघात घडला. या अपघाताऐ ७ प्रवासी जखमी झाले असून उर्वरित २९ प्रवासी अपघातातून वाचले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


banner 728x90

, दापोली ( जि. रत्नागिरी) आगारातून सकाळी ८.३० च्या सुमारास दापोली पुणे (एमएच.०६. बी.डब्ल्यू.०५४५) ही शिवशाही बस महाड तालुक्यातील रेवतळे आंग्रे कोंड या ठिकाणी आली असता, समोरून येणाऱ्या खाजगी कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने ब्रेक मारला, त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन आदळली,

या बसमधून ३१ प्रवासी प्रवास करीत होते, मात्र यातील दोन प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर प्रवाशांना मात्र किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून महाड आगारातील आगार व्यवस्थापक फुलपगारे यांनी दुसऱ्या एसटी बस मधून महाड येथे स्थलांतरित केले आहे.

जखमींमध्ये रियाज हरसिलकर वय ३२ रा. बोरोंडी, समीक्षा सारंगे वय ३२ रा. पुणे, निलोफर हरसिलकर २६ बोरोंडी, मनिषा मनोहर महाडिक रा. हर्णे, नूरजहाँ रियाज हर्सिलकर ५२ दापोली, शैरीश माटवनकर वय २२, काजळपुरा महाड. शमशा माटवनकर ४४ महाड यांचा समावेश आहे. जखमींवर महाड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.


गेली काही दिवस या सुस्थितीतील मात्र तीव्र उतार असलेल्या रस्त्यांवर सातत्याने अपघात होत असल्याने हा मार्ग चर्चेत आला आहे. या मार्गावर उपाययोजना करण्यासाठी काही ठिकाणी निसरडा रस्ता खरडवण्यात आला. मात्र यामुळे रस्त्याचे नुकसान होणार आहे. वाहन चालकांनी देखील रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष देऊन वाहन चालवले पाहिजे अशा प्रकारचा सल्ला अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे.

दोन तासानंतर याच मार्गावर पुन्हा अपघात


महाड तालुक्यातील रेवतळे गावाजवळ असलेल्या आंग्रे कोंड येथे महामंडळाच्या प्रवासी बसला अपघात घडल्यानंतर अवघ्या दोन तासात याच मार्गावर दापोली वरून महाडच्या दिशेने येणाऱ्या कारला अपघात झाला असल्याची घटना घडली. याच मार्गावर असलेल्या लोखंडे कोंड या वसाहती नजीक रस्त्यावर तीव्र उतार असल्याने, वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन कोसळली, सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर आज पर्यंत महाड वरून दापोलीकडे जाणाऱ्या मार्गावर १७ अपघाताची नोंद झाली आहे… पाऊस सुरू होताच या मार्गावर वाहनांचे अपघात घडत असल्याचे आढळून आल्यामुळे या रस्त्यामध्ये कोणता दोष आहे याची पाहणी तज्ञांकडून करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. अपघात घडत असल्याने वेगवेगळे

तर्कवितर्क काढले जात असून रस्ता तीव्र उतार आणि गुळगुळीत असल्याचे कारण पुढे दाखवीत असताना वाहनांच्या टायरच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे, (निकामी झालेल्या टायरचा वापर प्रवासी बसेस ना केला जातो) बहुतांशी महामंडळाच्या प्रवासी बसेस अपघाताचे कारण ठरत असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.महामंडळाच्या बसेसची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाड पोलादपूर तालुका प्रवासी संघटने कडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *