गुहागर : बसस्थानकात वाहकाला मारहाण

banner 468x60

गुहागर बसस्थानकावरुन सुटणारी गुहागर-धोपावे एसटी सोडण्यावरून बसच्या वाहकाला एका प्रवाशाने धमकी देत त्याला मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजता ‘घडली. या प्रकरणी वाहक चाँद नजीर शेख याने एका प्रवाशाविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

banner 728x90


गुहागर एसटी आगारात २०१९ पासून वाहक तथा चालक म्हणून सेवा बजावणारे चाँद नजीर शेख व त्यांचे सहकारी चालक सुधीर दत्ताराम खांडेकर १० एप्रिल रोजी गुहागर-धोपावेमार्गे सावंतवाडी या गाडीवर कर्तव्य बजावत होते. गुहागर बसस्थानकाच्या फलाटावरुन सायंकाळी ५:४५ वाजता ही बस सोडण्यासाठी मागे घेत असताना सदर प्रवासी बसजवळ आले.

त्यांनी वाहक शेख यांना ही बस धोपावेला जाणार आहे का, अशी विचारणा केली. यावर शेख यांनी ‘ही बस धोपावे-सावंतवाडी थांब्यापर्यंत जाईल, अशा आम्हाला आगारातून सूचना असल्याचे शेख यांनी सांगितले. तसेच तुम्ही बसस्थानक नियंत्रण कक्षात विचारा, असे सांगितले. यावर त्या प्रवाशाने अपशब्द वापरंत शेख यांच्याबरोबर हुज्जत घातली. यावेळी काही प्रवाशांनी प्रकरण मिटवण्याची मध्यस्थी केली.

या दरम्यान, चालक सुधीर खांडेकर, कंट्रोलर सुधाकर पालशेतकर तेथे आले व त्यांना समजावण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र त्या प्रवाशाने ऐकून न घेता शेख यांच्यावर धावून जावून त्यांना मारहाण केली.

तसेच धमकी दिल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वरिष्ठांची चर्चा करुन वाहक शेख यांनी त्या प्रवाशाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *