रत्नागिरी जिल्ह्यातील १३६ गावामंध्ये ३८५ मिळकती वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) नावे आहेत. त्यापैकी ३२२ मिळकतींची नोंद १३ एप्रिल २०१६ च्या शासननिर्णयाप्रमाणे नोंद झाली असून, उर्वरित ६३ मिळकतींची नोंद बाकी आहे. आकडेवारी पाहता मंडणगड तालुक्यात वक्फच्या नावे १० गावांमध्ये २८ मिळकती आहेत.
एकूण ४० हेक्टर जमीन आहे. जिल्ह्यात वक्फच्या ३८५ मिळकती असून, १७८ हेक्टर जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले. संसदेच्या दोन्ही सभागृहात मागील आठवड्यात वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) पारित झाले असून, आता राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरीदेखील केल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे.
या पार्श्वभूमीवर वक्फ
बोर्डाकडे रत्नागिरीत किती मालमत्ता आहे या विषयी माहिती घेतली असल्याचे जिल्ह्यात १७८ हेक्टरपेक्षा अधिक जमिनी वक्फच्या नावाच्या असल्याचे निदर्शनास आले. दापोलीत १९ गावांमध्ये ५६ मिळकती आहेत. त्यांचे क्षेत्र १७ हेक्टर ६९ गुठेंपेक्षा अधिक आहे. खेडमध्ये १९ गावांमध्ये ५० मिळकती आहेत. ७ हेक्टर ७ गुंठे जमीन आहे. चिपळूणमध्ये वक्फकडे सर्वाधिक जागा असून २२ गावांमध्ये ६५ मिळकती आहेत. ७५ हेक्टर १४ गुंठेपेक्षा अधिक क्षेत्र आहे.
गुहागरमध्ये १२ गावांमध्ये २४ मिळकती असून, ४ हेक्टर ७१ गुंठे जमीन आहे. संगमेश्वर तालुक्यात १६ गावांमध्ये ३४ मिळकती असून, ६ हेक्टर २ गुंठे क्षेत्र वक्फच्या नावे आहे. रत्नागिरी तालुक्यात २६ गावामध्ये ५९ मिळकतीमध्ये ६ हेक्टर २ गुंठे जागा आहे. लांजात ४ गावांमध्ये ७ ठिकाणी ३ हेक्टर ८५ गुंठे जमीन आहे.
राजापूर तालुक्यात १० गावांमध्ये ६२ मिळकती असून, ८ हेक्टर ४३ गुंठे जमीन आहे. एकूण ३८५ मिळकती जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या आहेत. १७८ हेक्टर ८२ गुंठे ४२ आर इतके क्षेत्र वक्फ बोर्डाच्या नावे आहे. त्यातील ३२२ गावामध्ये शासननिर्णयाप्रमाणे नोंद झालेल्या मिळकतींची संख्या ३२२ आहे. उर्वरित ६३ मिळकतीची नोंद अद्याप बाकी आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*