रत्नागिरी : ब्राऊन शुगरसदृश पदार्थासह एकास अटक

banner 468x60

शहरातील जायस्तंभ येथे रविवारी दुपारी ३.१५ वाजता गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाने ब्राऊन शुगरसदृश पदार्थ व दुचाकीसह एकाला ७७ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.

banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान आदिल अशरफ शेख ( ३० , रा. गोळाप सडा, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने शहरात पेट्रोलिंग करत होते.

तेव्हा जयस्तंभ येथील ‘खाना खजाना’ हॉटेलजवळ एक तरुण दुचाकीसह संशयित हालचाली करीत असताना आढळला. पथकाने त्याची चौकशी केली. त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने झडती घेतली असता आदिल शेखकडे असलेल्या पिशवीमध्ये ब्राऊन शुगरसदृश्य अमली पदार्थाच्या १५ पुड्या व इतर साहित्य मिळून आले. त्याच्याकडून दुचाकीसह ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट ८ (क) २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत . ही कामगिरी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे, बाळू पालकर, दीपराज पाटील व गणेश सावंत यांनी केली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *