गुहागर : ट्रिपल सीट घेऊन एसटीला ओव्हरटेक, एसटी आणि दुचाकीची धडक, तीन जखमी

Screenshot

banner 468x60

गुहागर शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे दुचाकीस्वाराने बसला दिलेल्या धडकेत तिघेजण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११.०० वा. सुमारास घडली.

banner 728x90

याप्रकरणी एसटी चालकाने गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश रविंद्र दिंडे (४६, व्यवसाय एस. टी. चालक, रा. आबलोली कोष्टेवाडी) हे त्यांच्या ताब्यातील एसटी बसमध्ये प्रवाशांना घेऊन गुहागरकडून आबलोलीकडे जात होते.

त्याचवेळी गुहागर शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील १५० मीटर अंतरावर वळणावर समोरून गुहागरच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी येत होती. या चारचाकीच्या पाठीमागून दुचाकी (जीए-०८-एजे-४४५०) भरधाव वेगात येत होती. दुचाकीस्वार मुकेश बाबु खाटीक (वय ३५, मूळ रा. पिलोदा, ता. गंगापूर सिटी, जि. सवाई माधोपूर, राजस्थान, सध्या रा. मुरादपूर कंभारवाडी

चाफेचौक, ता. चिपळूण) हा ट्रिपल सीट घेऊन चारचाकीला ओव्हरटेक करत होता. यादरम्यान, त्याची दुचाकी एसटीच्या चालक बाजूकडील पुढील चाकाच्या पाठीमागे आदळली. त्यामुळे अपघात होऊन दुचाकी मागील चाकाच्या भागाजवळ जाऊन पडली. या अपघातात दुचाकीस्वार मुकेश खाटीक

स्वतः तसेच त्याच्या पाठीमागे बसलेली पत्नी लक्ष्मी मुकेश खाटीक (वय ३२) आणि मुलगा विराज मुकेश खाटीक (वय १६) हे किरकोळ जखमी झाले. या अपघातात त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. फिर्यादी उमेश दिंडे यांच्या तक्रारीनुसार, दुचाकीस्वार मुकेश खाटीक याच्या निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने ट्रिपल सीट दुचाकी चालवण्यामुळे हा अपघात झाला, असे म्हटले आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्यातील १८४, १२८(१)/१९४(क), १२९/१९४(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *