रत्नागिरी : जिल्ह्यातील 80 ग्रामपंचायतींना मिळणार घंटागाड्या, 7 कोटी मंजूर

banner 468x60

जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी घंटागाड्या मिळणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजनमधून नागरी सुविधाअंतर्गत ७ कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. या गाड्या लवकरच खरेदी करून त्या ग्रामपंचायतींना देण्यात येणार असल्याने अस्ताव्यस्त कचरा यापुढे त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये दिसणार नाही, अशी व्यवस्था या घंटा गाड्यांमुळे होणार आहे.

banner 728x90

जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायती असून त्यापैकी ७० ग्रामपंचायतीकडे घंटा गाडथा आहेत, तर उर्वरित ७७७ ग्रामपंचायतीकडे कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांच्या कचऱ्यासाठी कचराकुंडीची सोय ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. गावातील व बाजारपेठेतील इतरत्र अस्ताव्यस्त पडणारा ओला व सुकर कचरा याची विल्हेवाट लावण्यासाठी व गावाच्या दृष्टीने प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेऊन गाव व बाजारपेठ स्वच्छ
ठेवण्यासाठी पर्याय म्हणून कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडीचे आवश्यकता होती,

त्यासाठीच या घंटागाड्या ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत. या पंटागाथा मुजीबोलात जाऊन ग्रामस्थांचा कचरा गोळा करणार आहेत. स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतीकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात.

गावातील तसेच बाजारपेठेतील ओला कचरा उबलण्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या घंटागाडीचा वापर करण्यात येणार आहे.


घंटागाडी मिळणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या

दापोली ९

खेड ९

चिपळूण १०

गुहागर ८

संगमेश्वर ८

रत्नागिरी २७

राजापूर ९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *