रत्नागिरी जिल्ह्यात महिलासंबंधित गुन्हे वाढू लागल्यामुळे पोलिस यंत्रणेसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत महिलांशी संबंधित १४९ गुन्हे जिल्हाभरात दाखल झाले असून, त्यापैकी १४१ गुन्हे उघड झाले आहेत.
यात सर्वाधिक अपहरणासह बलात्काराचे प्रमाण अधिक आहे. रत्नागिरी जिल्हा पूर्वी शांत जिल्हा म्हणून ओळखला जात असे. महिलांसाठीही अतिशय सुरक्षित असे वातावरण होते. त्यामुळे महिला, मुली निर्भयपणे बाहेर पडत होत्या. इतरही गुन्ह्यांचे प्रमाण तसेच कमी होते; मात्र आता वातावरण बदला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात कमी असले सदी अलीकडच्या काळात गुन्हेगारी वाढू लागली आहे.
त्यामुळे पोलिस यंत्रणेलाही अधिक सजग राहावे लागत आहे. कोकण रेल्वे आल्यानंतर कोकणचा विकास होऊ लागला. व्यवसाय, नोकरी, पर्यटन या निमित्ताने रत्नागिरीत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रत्नागिरीतील औद्योगिक क्षेत्रात कामाला येणारा कामगार वर्ग मोठ्या संख्येने बाहेरून येतो. त्यामुळे ही संख्या वाढायला लागली आहे. बाहेरून येणाऱ्यांच्या वाढत्या संख्येने गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे.
हे गुन्हे स्थानिकांकडून घडण्याची संख्या अगदी कमी आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांचा कालावधीत महिलांविषयक पोलिस यंत्रणेच्या तत्परतेमुळे यापैकी १४१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासासाठी पोलिस आधुनिक सुविधांचा वापर करत असल्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास चांगली मदत्त होत आहे.
जिल्हात गेल्या महिन्यात महिलांविषयक दाखल गुन्ह्यांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांची दाखल संख्या सर्वाधिक ३० इतकी असून, हे सर्व उघड झाले आहे तर अपहरणाचे २६ गुन्हे आहेत. त्यापैकी २१ गुन्हे उघड झाले आहेत. दोन खुनांचा प्रयत्नगेल्या सात महिन्यांत दाखल आणि उघड झालेले गुन्हे असे खुनाचा प्रवत्न-२, उघड-२, हुंडाबळी नाही, आत्महत्या ही उघड झाली. अपहरण-२६ त्यापैकी २१ उघड झाले. अनैतिक देह व्यापार-३ या तिन्ही गुन्ह्यांची उकल झाली आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*