चिपळूण : नगर परिषद निवडणुकीत 142 अर्ज वैध, नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवार रिंगणात

banner 468x60

चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. नगराध्यक्ष पदासाठी १३, तर नगरसेवक पदांसह मिळून एकूण १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

banner 728x90

एका पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता १२९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या लढती स्पष्ट होतील.
मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी सर्व अर्जांची छाननी झाली.

यामध्ये १४१ अर्ज वैध, तर १३ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल भोसले यांनी दिली. छाननीनंतर एकूण १२९ नामनिर्देशन पत्रे मतदानासाठी पात्र राहिली आहेत.


नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या १३ अर्जांपैकी ३ अर्ज बाद, तर ८ अर्ज वैध ठरले असल्याचेही विशाल भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *