शृंगारतळी : येथे 27 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी-पालपेणे रस्त्यावरील दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या घरात त्यांचा भाचा प्रशांत मारुती कदम (वय २७) याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

गेले काही दिवस मानसिक तणावाखाली असल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज फिर्यादी दत्ता घाडी यांनी आपल्या जबाबात दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मारुती कदम याचे मुळगाव कनार्टक राज्यातील काटगाळी (खानापूर, जि. बेळगांव) हे आहे. गेली १० वर्ष तो आपल्या मामाकडे दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या पालपेणे येथे राहतो.

दत्ता घाडी यांनी प्रशांतला आपल्या घरामधील वरच्या मजल्यावर राहण्यासाठी खोली दिली होती. बांधकाम कामगार म्हणून तो मजुरीवर काम करत होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो शृंगारतळी येथील बेलवलकर यांच्या दुकानाचे काम करण्यासाठी गेला.

मात्र सकाळी १० च्या दरम्यान डोके दुखत असल्याचे सहकारी उम्मीद सिंग याला सांगून तो कामावरुन घरी येवून आपल्या खोलीत गेला. दुपारी जेवणाची वेळ झाली म्हणून दत्ता घाडी त्याला बोलावण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले.

त्यावेळी प्रशांत कदम याने आपल्या खोलीला समोरच्या व मागच्या बाजूने आतून कडी लावल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याने मोबाईल वर केलेला फोनही उचलला नाही. अखेर दत्ता घाडी यांनी एका कामगारास मागील दरवाज्याजवळची खिडकीची काच फोडण्यास सांगितले.

त्यावेळी प्रशांत कदमने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याची माहिती देताना दत्ता घाडी यांनी पोलिसांना दिली. तो काही गोष्टीमुळे मानसिक तणावामध्ये असल्याने त्याने आत्महत्या केली असावी असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लुकमान तडवी व कुमार घोसाळकर करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *