रत्नागिरी : व्यापाऱ्याकडे दीड लाखांच्या खंडणीची मागणी

banner 468x60

रत्नागिरीतील शहरातील बाजारपेठ येथे एका व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केल्याचा पकार समोर आला आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

वारंवार मागण्यात येणाऱ्या खंडणीमुळे व्यापाऱ्याने कंटाळून अखेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुसैन नाजीम हकिम व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील बाजारपेठ येथील एका व्यापाऱ्याकडे अनेक वेळा खंडणीची मागणी करण्यात आली. मार्च 2020 ते 10 जून 2023 या कालावधीत वारंवार मागणी करण्यात आली.

बदनामीच्या भीतीने व्यापाऱ्याने 1 लाख 21 हजार रुपये दिले. मात्र त्यांची मागणी वाढतच चालली. या वाढत्या मागणीला कंटाळून व्यापाऱ्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी खंडणी पकरणी हुसैन नाजीम हकिम व अन्य एकावर भादविकलम 384, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *